‘83’ मध्ये हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका

ravi-shastri
मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला रणवीर सिंहचा गली बॉय सध्या बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घालत आहे. त्याच दरम्यान रणवीर त्याच्या आगामी 1983 क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीमवर येऊ घातलेला चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे. रणवीर ‘83’ या चित्रपटात भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार कपिल देव याची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा आपल्या समोर येणार आहेत. त्यातच आता या चित्रपटात रवी शास्त्रीची भूमिका कोण साकारणार याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे.
याबाबत मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात रवी शास्त्रीची भूमिका ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ फेम अभिनेता धैर्य कारवा साकारणार असल्याचे म्हटले आहे. धैर्यने ‘उरी’मध्ये सरताज सिंह चंदोक नामक पात्र साकारले होते. त्याच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. तूर्तास स्वत:ला रवी शास्त्रीच्या भूमिकेत बसवण्यासाठी धैर्य मेहनत घेत आहे.
त्याचबरोबर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा तर साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये पंजाबी अभिनेता एमी विर्कही झळकणार आहे. यात चिराग पाटील वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे.

Post a Comment

0 Comments