जामिनावर बाहेर असलेल्याने किती बोलावे याचा विचार करायला हवा

devendra-fadanvis
नांदेड – नांदेड येथे शुक्रवारी भाजपच्या बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बूथ प्रमुखांना संबोधित केले. देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून विरोधकांचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना विरोधकांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून नक्कलाकारांना त्यांना सभेत आणावे लागतात आणि नरेंद्र मोदीजींची स्टाइल ती लोक मारतात. पण या नक्कलाकारांनी एवढेच लक्षात ठेवावे सूर्याकडे पाहून थुंकल्यावर ती थुंकी आपल्याच तोंडावर पडते. याच सभेत फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा देखील खरपूर समाचार घेतला.
छगन भुजबळ यांना तुरुंगवास हा स्वातंत्र्यलढ्यासाठी नाही तर भ्रष्टाचार केला म्हणून झाला होता. पण त्यांनी एक लक्षात ठेवावे की तुमची निर्दोष मुक्तता झालेली नाही, तर तुम्ही सध्या जामीनावर बाहेर आहात. त्यामुळे आपण किती आणि बोलावे हे लक्षात ठेवले पाहिजे. सारा देश पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत शोक व्यक्त करत असताना विरोधकांनी, आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले खरे; परंतु विरोधक याबाबत राजकारण करत आहे. खरे देशभक्त असाल तर सैन्याच्या पाठीशी उभे राहा, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments