दिंडेगाव प्रकरणात अखेर गुन्हा दाखल , पण गंभीर कलमे वगळली !

तुळजापूर –  दिंडेगाव प्रकरणात २४ घंटे उलटल्यानंतर अखेर नळदुर्ग पोलिसांनी सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, मात्र ३०७ व ३९७  ही कलमे  वगळ्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणात एक बडा  राजकीय पुढारी हस्तक्षेप करत असून, पोलिस राजकीय दबावाखाली तपास  करत असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय सैन्य दलात देशाची सेवा करणारा जवान बालाजी गुरव एक महिन्याच्या सुट्टीवर  दिंडेगावात  आला आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता सहा जणांनी त्यास काठ्या, कुऱ्हाडी आणि तलवारीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले पण नळदुर्ग पोलीस या प्रकरणात गंभीर दिसत नाहीत. २४ घंटे उलटले तरी या प्रकरणात गुन्हा दाखल केला नव्हता.
या प्रकरणाचा उस्मानाबाद लाइव्हने पाठपुरावा केल्यानंतर अखेर राहुल मचाले, कल्लेश्वर मचाले, हरी मचाले, मारुती काशीद, दत्तू मचाले आणि एक महिला अश्या सहा जणांविरुद्ध भादंवि ३९५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र भादंवि ३०७, ३९७  ही कलमे वगळ्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
काठ्या, कुऱ्हाडी आणि तलवारीने मारहाण झाल्यामुळे जवान बालाजी गुरव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणात तुळजापूर तालुक्यातील एक बडा  राजकीय पुढारी आणि त्याची मुले हस्तक्षेप करत असून, पोलिस राजकीय दबावाखाली काम करत असल्याचे दिसून येत आहे.या प्रकरणात तडजोड करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. मात्र गुरव यांचे नातेवाईक ठाम राहिल्याने पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या गंभीर गुन्ह्यात गंभीर कलमे वेगळ्याने पोलिसाच्या तपासावर आश्चर्य व्यक्त होत आहे. 
काय आहे प्रकरण ?
भारतीय सैन्य दलात देशाची सेवा करणारा जवान बालाजी गुरव एक महिन्याच्या सुट्टीवर  दिंडेगावात  आला आहे.शक्रवारी रात्री आठ वाजता गावातून जाताना वरील आरोपींची या रस्त्याने का जातोस म्हणून काठ्या, कुऱ्हाडी आणि तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि नाईट पॅण्टमधील पाकीट काढून पळून गेले. 

Post a Comment

0 Comments