जवान बालाजी गुरव हल्ला प्रकरणी गुरव समाज आक्रमक

आरोपींविरुद्ध 307, 397 कलम लावण्याची मागणी

उस्मानाबाद –  भारतीय लष्करात देशाची सेवा करणारा जवान बालाजी गुरव एक महिन्याच्या सुट्टीवर आला असता, दिंडेगावातील काही गावगुंडानी त्याच्यावर  भ्याड हल्ला केला, याप्रकरणी गुरव समाज आक्रमक झाला असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी रस्त्यावर उतरला होता.
जवान बालाजी गुरववर दिंडेगावातील हरी मचाले आणि त्याच्या  ५ ते ६ गावगुंडांनी भ्याड हल्ला केल्यानंतर 24 घंटे उलटले तरी गुन्हा दाखल झाला नव्हता, आरोपींवर कारवाई करताना नळदुर्ग पोलीस बोटचेपेपणाचे धोरण  अवलंबत आहेत . बालाजी गुरव यास डोक्यास गंभीर दुखापत झाली असताना 307, 397 ही कलमे वगळली आहेत.
आरोपी विरुद्ध हे दोन्ही कलमे लावण्यात यावीत,बालाजी  गुरव कुटुंबास पोलीस संरक्षण देण्यात यावे, त्याच्याविरुद्ध करण्यात आलेली खोटी क्रॉस तक्रार मागे घेण्यात यावी तसेच आरोपी कडून चिरीमिरी घेवून फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावर दबाब आणणाऱ्या सपोनि मिरकले यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना गुरव समाजाच्या वतीने सोमवारी निवेदन देण्यात आले तसेच या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष गोपाळराव नळेगांवकर, बाळासाहेब क्षीरसागर, नगरसेवक युवराज नळे,नगरसेवक सोमनाथ गुरव,माजी पंचायत समिती सभापती बालाजी मोकाशे, रंगनाथ गुरव, सचिन धारूरकर, अजित मोकाशे, सुदर्शन मोकाशे , ऍड. प्रशांत खंडाळकर, ऍड बिराजदार, ऍड. पाटील, महेश मोटे, प्रमोद बचाटे, सुनील तीर्थंकर तसेच दिंडेगाव आणि जिल्हाभरातील गुरव समाज बांधव मोठ्या संख्नेने उपस्थित होते.Post a Comment

0 Comments