ट्रम्प रशियाचे सिक्रेट एजंट- एफबीआय अधिकाऱ्यांना शंका

rashia
अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयचे माजी उपव्यवस्थापक अँड्र्यू मॅकेब यांनी सीएनएनच्या एन्डरसन कपूर यांना मुलाखत देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे सिक्रेट एजंट असावेत अशी आम्हाला शंका असल्याचे सांगितले. अँड्र्यू मॅकेब यांना ट्रम्प अजूनही रशियाला सामील आहेत याची एफबीआय ला खात्री आहे काय असा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले, आम्ही तपास सुरु केला होता आणि त्यातून नक्की काय निष्पन्न होणार याची चिंता आहे.
अँड्र्यू मॅकेब यांनी लिहिलेले द थ्रेट हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून मंगळवारी प्रकाशन झाल्याबरोबर ते बेस्ट सेलर यादीत सामील झाले आहे. अँड्र्यू मॅकेब म्हणाले ट्रम्प यांची धोरणे नेहमीच वादग्रस्त आहेत. ट्रम्प अनेकदा त्यासाठी सोशल मिडीयावर ट्रोल झाले आहेत. या पुस्तकात अँड्र्यू मॅकेब यांनी ट्रम्प यांच्या कारकिर्दीत काम करत असताना आलेले अनुभव आणि परिस्थिती वर्णन केली आहे. ते म्हणतात, आमच्या गुप्त संस्थेचा पायाभूत ढाचा कमी करण्याचा ट्रम्प यांनी नेहमीच प्रयत्न केला आणि त्यामुळे आमच्या महिला, पुरुष अधिकारांच्या कामावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला. २०१६ मध्ये फेडरल लॉ इंफोर्समेंटने जबाबी कारवाई सुरु केली तेव्हाच ट्रम्प रशियाच्या हिशोबाने काम करत आहेत अशी शंका आली होती असा खुलासा त्यांनी यावेळी केला.
व्हाईट हाउसकडून अँड्र्यू मॅकेब याच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. अँड्र्यू मॅकेबचे खोटारडे आहेत असे व्हाईट हाउस प्रवक्ता म्हणाला.त्यामुळेच त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले गेले असेही त्याचे म्हणणे आहे. अँड्र्यू मॅकेब याच्यावर हिलेरी क्लिंटन याच्या इ मेल चा एफबीआयने केलेल्या तपासाची माहिती मिडीयाला दिल्याचा आरोप ठेवला गेला होता.

Post a Comment

0 Comments