उस्मानाबाद – अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर उस्मानाबाद शहरात अखेर पासपोर्टचे क्षेत्रीय कार्यालय सुरू झाले असून, शुक्रवारी या कार्यालय...
उस्मानाबाद – अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर उस्मानाबाद
शहरात अखेर पासपोर्टचे क्षेत्रीय कार्यालय सुरू झाले असून, शुक्रवारी या
कार्यालयातून १० पासपोर्टचे व्हेरिफिकेशन करण्यात आले. मंगळवारी (दि.२६)
कार्यालयाच्या अौपचारिक उद्घाटन होणार आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत
पासपोर्टच्या कामकाजाचे उद्दिष्ट आणखी वाढण्याची शक्यता आहे.प्रत्येक
जिल्ह्यात पासपोर्ट सुरू करण्याच्या शासनाच्या धोरणानुसार सर्वत्र
पासपोर्टचे क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्यात आली असून, उस्मानाबादला
कार्यालयाची प्रतीक्षा हाेती. काही महिन्यांपासून शहरातील पोस्ट
कार्यालयाच्या बाजूला एका खाेलीत पासपोर्टच्या क्षेत्रीय कार्यालयाची तयारी
सुरू होती. शुक्रवारी सकाळी कार्यालयातून कामकाजाला सुरुवात झाली.ऑनलाईन
नोंदणी आलेल्या १० पासपोर्टसंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. २
कर्मचाऱ्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत १० पासपोर्टसंबंधीच्या कागदपत्रांची
पडताळणी केली. मंगळवारी पासपोर्ट कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या
तसेच लोकप्रतिनिधींच्या हस्ते पासपोर्टच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार
आहे. त्यानंतर मात्र वेग वाढून दररोज १० पेक्षा अधिक पासपोर्टचे कामकाज
होईल.या कार्यालयामुळे उस्मानाबादकरांचा सोलापूरला जाण्याचा त्रास वाचणार
आहे.
COMMENTS