सौदी अरेबियाच्या प्रिन्सची दुट्टपी भूमिका

saudi-arebia
नवी दिल्ली- दहशतवादाच्या विरोधात आपण भारतासोबत आहोत, अशी हमी भारत भेटीवर आलेले सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहंमद बिन सलमान यांनी दिली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत म्हणाले, आम्ही दहशतवादाबाबत गुप्त माहितीच्या देवाणघेवाणीसह भारताशी सहकार्यास तयार आहोत.
मोदींच्या २०१६मधील सौदी दौऱ्यात ३ लाख कोटींच्या गुंतवणूक करारावर सहमती दर्शवली होती. आम्ही त्याच दिशेने आता पावले टाकत आहोत. याच आठवड्यात सलमान यांनी पाक दौऱ्यात पाकला २० अब्ज डॉलरची (१.४ लाख कोटी) आर्थिक मदत दिली. याशिवाय सौदी अरेबियातील तुरुंगात असणाऱ्या २१०० पाकिस्तानी कैद्यांच्या सुटकेची घोषणा केली. पंतप्रधान मोदी सलमान यांच्या भेटीच्या वेळी म्हणाले, दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांवर दबाव आवश्यक आहे. सौदी अरेबिया आणि भारताचे विचार एकसारखेच असल्याचा मला आनंद वाटतो.

Post a Comment

0 Comments