भारतात शिकण्यासाठी येणार २५ हजार ब्रिटीश विद्यार्थी

student
कोलकाता- भारताच्या संस्कृतीने भारावून गेलेले इंग्लंडचे २५ हजार विद्यार्थी भारतात शिकायला येणार असून हे विद्यार्थी आगामी पाच वर्षात अल्प मुदतीचे अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत.
याबाबत माहिती देताना ब्रिटिश कौन्सिलच्या शैक्षणिक प्रमुख सुचिता गोकर्ण म्हणाल्या की, पुढीलवर्षीपासून आम्ही ‘जनरेशन यूके’ हा प्रकल्प राबवणार आहोत. या प्रकल्पाअंतर्गत आम्ही इंग्लंडमधील विद्यार्थ्यांना भारतात आणणार आहोत. दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत व्हावेत आणि दोन्ही देशातील नागरिकांनी एकमेकांकडे जाण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. विविध संस्थांमध्ये हे विद्यार्थी अल्प अभ्यासक्रमासाठी येतील. तसेच ते शाळांमध्ये शिकवण्यासाठी मदत करतील, असे त्या म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments