राष्ट्रवादीची उमेदवारी राणा पाटील यांना जाहीर

 उस्मानाबाद लाइव्हचे वृत्त तंतोतंत खरे ठरले

उस्मानाबाद –  उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी अखेर आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांना जाहीर झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे. आमदार पाटील यांच्या उमेदवारीमुळे लोकसभेची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे.


उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी  सुरुवातीला  बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांचे नाव आघाडीवर होते.मात्र सोपल यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर फक्त  सौ अर्चनाताई पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र शरद पवार यांनी,  अर्चनाताईच्या नावास नकार देऊन आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांना स्वतः निवडणूक लढवण्याचा आदेश दिला. एक तर स्वतः निवडणूक लढवा किंवा आम्ही देईल त्या उमेदवाराला निवडून आणा, असा आदेश पवारांनी देताच, आमदार राणा पाटील हे लोकसभेच्या निवडणूक आखाड्यात उतरण्यास तयार झाले.


गुरुवारी काही चॅनलवर बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे नाव झळकत होते. मात्र केवळ उस्मानाबाद लाइव्हने आमदार राणा पाटील यांना उमेदवारी मिळणार असे वृत्त दिले होते. उस्मानाबाद लाइव्हचे हे वृत्त तंतोतंत खरे ठरले

सामना  रंगणार

शिवसेनेची उमेदवारी माजी आमदार ओम राजे याना जाहीर झाली आहे. ओम राजे आणि राणा पाटील असा सामना रंगणार आहे. आमदार राणा पाटील यांच्या उमेदवारीमुळे लोकसभेची निवडणूक  अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे.

कोण आहेत राणा पाटील ?
– उस्मानाबाद- कळंब विधानसभा मतदार संघाचे आमदार
–  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष
– माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र

Post a Comment

0 Comments