उस्मानाबादच्या उमेदवारीचा सस्पेंस कायम ! दादा की ताई ?

उस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या आणि दुसऱ्या यादीत उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे  निवडणूक आखाड्यात दादा की ताई उतरणार याबाबत  सस्पेंस  कायम आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होवून  पाच दिवस झाले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार जाहीर करणार आहे.

शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील तर शिवसेनेची उमेदवारी माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मिळाल्यास  राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे  निवडणूक आखाड्यात उतरणार आहेत.

शिवसेनेचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे घोडे आडले आले. शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात   राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होईल, असे सांगितले जात आहे.  मात्र राष्ट्रवादीचा उमेदवार हा पाटील पती - पत्नीपैकी एक राहील हे नक्की आहे. त्यामुळे ताई की  दादा याबाबत  सस्पेंस  कायम आहे. 

Post a Comment

0 Comments