उस्मानाबाद राष्ट्रवादीकडेच !

उस्मानाबाद - शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आपला उमेदवार जाहीर करीत नसल्याने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वातावरण अद्याप थंड आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी ४० अर्जाची विक्री झाली आहे.

शिवसेनेच्या उमेदवारीसाठी विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही गट आमने सामने भिडले असून, ऐन निवडणुकीत सेनेतील गटबाजी उफाळून आली आहे. सेनेची उमेदवारी कोणाला मिळते, याबाबत प्रचंड औत्सुक्य  आहे.

दुसरीकडे सेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच राष्ट्रवादी आपला पत्ता ओपन करणार आहे. गायकवाड यांना सेनेची उमेदवारी मिळाल्यास जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील तर ओमराजेंना उमेदवारी मिळाल्यास आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे कळते.

उस्मानाबाद राष्ट्रवादीकडेच !
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार असल्याची बातमी एका चॅनलवर झळकली होती. मात्र या बातमीत तथ्य नसल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार असून, उमेदवार मात्र सेनेच्या निर्णयानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

४० अर्जाची विक्री
मंगळवारपासून उमेदवारी अर्जाची विक्री सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी २३ जणांनी ४२ अर्ज नेले आहेत. मात्र एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.Post a Comment

0 Comments