शिवसेनेची उमेदवारी ओम राजेंना जाहीर

  खासदार गायकवाड यांचा पत्ता कट
उस्मानाबाद -  शिवसेनेची उमेदवारी अखेर माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर झाली असून नॉट रिचेबल खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट झाला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांचा वरदहस्त ओमराजेंच्या कामी आला आहे.

शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत प्रचंड औत्सुक्य होते. विद्यमान खासदार प्रा. रवींद्र  गायकवाड यांच्या उमेदवारीला बहुसंख्य शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. जनतेत सुद्धा गायकवाड यांच्याबद्दल नाराजी होती. शिवाय राष्ट्रवादीकडून आमदार राणा पाटील यांची उमेदवारी फिक्स मानली जात असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

निवडणूक चुरशीची होणार
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार राणा पाटील यांची उमेदवारी फिक्स आहे. त्यांना  शिवसेनेचे माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर टक्कर देऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत केवळ दहा हजार मतांनी ओमराजेंचा प्रभाव झाला होता आणि राणा पाटील विजयी झाले होते. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ओमराजे सर्व शक्ती पणाला लावणार आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार आहे.

Post a Comment

0 Comments