चार गावाच्या कामाची चौकशी होणार

उस्मानाबाद - तालुक्यातील शिंगोली , शेकापूर, तेर आणि बेंबळी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कामात प्रचंड  भ्रष्टाचार झाला असून या कामाच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी सध्या कार्यरत असलेल्या राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्या मार्फत करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत.शिंगोली , शेकापूर, तेर आणि बेंबळी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कामात प्रचंड  भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकरी यांच्याकडे करून जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि लोकशाही दिनामध्ये हा विषय मांडला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत.या कामाची तपासणी निवेदनकर्ता समक्ष करण्यात यावी आणि तसा अहवाल घेऊन उचित कार्यवाही करावी असेही या आदेशात म्हटले आहे. या आदेशामुळे कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांची मोठी गोची झाली आहे.काय म्हटले आहे आदेशात ? 

Post a Comment

0 Comments