विद्यापीठ उपपरिसरात विद्यार्थी वस्तीगृह उभारणार

उस्मानाबाद  : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबाद उपपरिसरात येत्या आर्थिक वर्षासाठी (२०१९-२०२०) १४ कोटी ८७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी वस्तीगृह उभारण्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी दिली.

अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापीठ उपपरिसर मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण ठरावाची माहिती देण्यासाठी शनिवारी (दि.दोन) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी

प्राचार्य डॉ जयसिंग देशमुख, उपकुलसचिव आय आर मंझा, लेखाधिकारी प्रदीपकुमार जाधव, स्थावर व्यवस्थापक जितेंद्र पाटील, संजय शिंदे, विद्याधर गुरव आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल सगर संजय निंबाळकर यांच्या हस्ते ९० लाखांचा निधी सुपूर्द करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय दुधगावकर यांचीही उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments