केज : रजेवर असलेल्या शिक्षिकेस गटशिक्षणाधिकार्यांनी प्रशासकीय टपाला संदर्भात भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. मात्र भ्रमणध्वनीवर बोलताना झा...

तालुक्यातील लहुरी केंद्रातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका या (ता. 5 व 6 मार्च) या कालावधीत अर्जीत रजेवर होत्या. त्या रजेवर असतानाही गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी त्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास संपर्क करून टपाल घेऊन जाण्यासाठी केजला या असे आदेशीत केले. परंतू या शिक्षिकेने मी रजेवर असल्याने येऊ शकत नाही! असे सुनावले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी व सहशिक्षिका यांच्यात झालेल्या बाचाबाचीत संतप्त झालेल्या शिक्षिकेने दुपारी एक वाजता गटविकास अधिकारी कार्यालयात येवून लक्ष्मण बेडसकर यांचे गच्चीला धरुन मारहाण केली. हा प्रकार घडत असताना कार्यालयातील उपस्थित कोणताही कर्मचारी मध्यस्थी करण्यासाठी आला नाही. या प्रकार घडल्याबाबत गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी दुजोरा दिला.
सदरील प्रकार लहुरीचे केंद्र प्रमुख राख यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढून घेतल्याने झाला असल्याचे त्यांनी सांगितले. मारहाण करणारी शिक्षिका ही राख यांची नातेवाईक असल्याने तिने पदभार काढल्याचा राग मनात धरून हा प्रकार केला असल्याचेही सांगितले. तर सदरील शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी आपणास भ्रमणध्वनीवरुन अपशब्द वापरल्याने व पैशाची मागणी केल्याने मारहाण केल्याचे सांगितले. यात राख यांचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आपण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार नसल्याचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी सांगितले.
गटशिक्षणाधिकार्यांची वादग्रस्त कारकीर्द -
गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांना यापूर्वी ही महिला शिक्षिकेकडून लाच स्वीकारता रंगेहाथ पकडण्यात आल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना माजलगाव येथे विस्तार अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला होता.
COMMENTS