उद्या ११ वाजता शिवसैनिकांनी ठेवली बैठक उस्मानाबाद - शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक नाराज ...
उद्या ११ वाजता शिवसैनिकांनी ठेवली बैठक
उस्मानाबाद - शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले असून पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या शनिवारी उमरग्यात शिवसैनिकांनी बैठक ठेवली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष वेधले आहे.
दोन वेळा आमदार आणि एक वेळा खासदार असलेल्या रवींद्र गायकवाड यांचे तिकीट यंदा कापण्यात आले आहे. . शिवसेनेची उमेदवारी ओमराजेंना जाहीर होताच गायकवाड समर्थक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. मागील निवणुकीत अडीच लाख मतांनी निवडून येऊनही तिकीट कापण्यात आल्याने गायकवाड यांच्या समर्थक शिवसैनिकांनी राजीनामा सत्र सुरु केले आहे.
मात्र गायकवाड यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. काही शिवसैनिकांनी त्यांना अपक्ष लढण्यासाठी प्रेरित करत आहेत. तसेच पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या शनिवारी उमरग्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेत माजलेली बंडाळी शिवसेना नेते थोपवणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

COMMENTS