कोणत्या उमेदवाराचा खर्च किती ?

उस्मानाबाद - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी आपला खर्चाचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केला आहे. सर्वात जास्त खर्च शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर तर त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी दाखवला आहे.

ओमप्रकाश भूपालसिंह पवनराजे निंबाळकर (पक्ष-शिवसेना) रु.35 लाख 63 हजार 241, राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) रु. 33 लाख 25 हजार 633, डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन (बहुजन समाज पार्टी) रु.66 हजार 940, अर्जुन सिद्राम सलगर (वंचित बहुजन आघाडी) रु.आठ लाख 66 हजार 435, अण्णासाहेब रामचंद्र राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल) रु. 93 हजार 708, दीपक महादेव ताटे (भा.प.सेना पार्टी) रु.एक लाख 34 हजार 668, विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (क्रांतिकारी जय हिंद सेना) रु.1लाख 2 हजार 541, आर्यनराजे किसनराव शिंदे (अपक्ष) रु.अठरा हजार 380, नेताजी नागनाथराव गोरे (अपक्ष) रु.1 लाख 27 हजार 855, जगन्नाथ निवृत्ती मुंडे (अपक्ष) रु.1 लाख 60 हजार 235, तुकाराम दासराव गंगावणे (अपक्ष) रु.37 हजार 400, डॉ.श्री.वसंत रघुनाथ मुंडे (अपक्ष) रु.1 लाख 86 हजार 10, शंकर पांडुरंग गायकवाड (अपक्ष) रु.64 हजार 511, सय्यद सुलतान लाडखाँ (अपक्ष) रु.29 हजार 257.

Post a Comment

0 Comments