आ. राणा जगजितसिंह 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत !


उस्मानाबाद -  कोणत्याही  घटना आणि प्रकरणावर प्रतिक्रिया देणारे तसेच आरोप झाल्यानंतर प्रत्यारोप करणारे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील  संभाव्य भाजप प्रवेशावर खुलासा अथवा खंडन करत नसल्याने संशयाची सुई वाढत चालली आहे. यामुळे  कार्यकर्त्यात घालमेल सुरु असून काही कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. राणा पाटील मात्र भाजप प्रवेशाबाबत "वेट अँड वॉच" च्या भूमिकेत दिसत आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त उस्मानाबाद लाइव्हसह अनेक माध्यमांनी गुरुवारी प्रसिद्ध केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात राजकीय गोटात भूकंप झाला. गावोगावचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या बातमीची खातरजमा करण्यासाठी एकमेकांना फोन करू लागले. आमदार राणा जगजितसिंह पाटील  आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या मोबाईलची रिंग दिवसभर वाजू लागली. बातमी खरी आहे का ? म्हणून विचारणा होऊ लागली. राणा पाटील आणि त्यांच्या  पीएने बातमीत तथ्य नसल्याचे सांगितले. मात्र  आमदार राणा पाटील यांनी  अद्याप  माध्यमासमोर  अधिकृत खुलासा केलेला नाही किंवा प्रेस नोट पाठवलेली नाही. कोणत्याही घटना अथवा प्रकरणावर तात्काळ खुलासा करणारे राणा दादा संभाव्य भाजप प्रवेशावर "वेट आणि वॉच" च्या भूमिकेत दिसत आहे.

का रंगली चर्चा ? 

  • लोहारा आणि उस्मानाबाद तालुक्याला जो पीक विमा मंजूर झाला, त्याचे श्रेय घेणाऱ्या होर्डिंग्जवर शरद पवार यांचा फोटो आणि पक्षाचे चिन्ह नाही.
  • राणा पाटील यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अद्याप फॉर्म भरला नाही.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वारंवार घेतलेली भेट.


अफवा की सत्य ?
आमदार राणा जगजितसिंह पाटील हे काही दिवसांपूर्वी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली, त्या भेटीत अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे सांगितले, त्यामुळे राणा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली.
उस्मानाबादच्या जागेची अडचण येत असेल तर किमान तुळजापूर तरी द्या म्हणून राणा पाटील यांच  आग्रह पण मुख्यमंत्र्याकडून कोणतेही ठोस आश्वासन नाही.भाजप - शिवसेना युती तुटली तर राणा पाटील यांचा प्रवेश निश्चित 

विधानसभा  निवडणूक जवळ आलेली असताना भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा कलगीतुरा सुरू झालेला आहे. जर भाजप आणि शिवसेना यांची युती  तुटली तर राणा पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

राणा पाटील आणि  शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात हाडवैर  आहे, हे सर्वश्रुत आहे.त्यामुळे राणा पाटील यांचा भाजप प्रवेश सध्या तरी शक्य नाही. जर युती तुटली तर हे वृत्त खरे ठरू शकते. 


संबंधित बातमी 


Post a Comment

0 Comments