40 रुपयांच्या बिलावरून नेट कॅफे मालकाचा खून

उस्मानाबाद – केवळ 40 रुपयांच्या बिलावरून ग्राहकाने नेट कॅफे मालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री उस्मानाबाद शहरातील एन्जॉय नेट कॅफेमध्ये ही घटना घडली. घटनेनंतर फरार झालेला आरोपी ग्राहक स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

दशरथ गेमा पवार (वय-36, रा. घाटगरी, ता.उस्मानाबाद) हा मागील काही वर्षांपासून उस्मानाबाद शहरात एन्जॉय नेट कॅफे चालवत होता. आरोपी विनोद लंगळे हा काही इंटरनेटवर काही कामानिमित्त आला होता. त्याने इंटरनेटचा वापरही केला. पण नेट कॅफेचे 40 रुपयांचे बिल देण्यास आरोपीने नकार दिला. त्यावरून कॅफे मालक दशरथ पवार व ग्राहक विनोद लंगळे यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान, विनोद लंगळे याने दशरथ पवार यांच्यावर हल्ला केला. आरोपीने दशरथ पवार यांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. छातीवर मार लागल्याने दशरथ पवार हे बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. एन्जॉय इंटरनेटकॅफे चे चालक दशरथ गेमा पवार वय 35 वर्षे रा. घाटंग्री, ता.जि.उस्मानाबाद यांनी दि.05.09.2019 रोजी 19.15 वा. सु. विनोद कुशेंद्र लंगाळे रा. किणी, ता.जि.उस्मानाबाद हाकॅफेत आला असता त्यास त्याने वेळोवेळी वापरलेल्या इंटरनेटचे बिल मागीतले. यावरुनत्या दोघांत वाद सुरु झाला. यावेळी विनोद कुशेंद्र लंगाळे याने दशरथ गेमा पवार यांनालाथाबुक्क्यांनी, चपलाने मारहान करुन त्यांचे डोके जमीनीवर, भिंतीवर आपटवुनत्यांना जिवे ठार मारले आहे. अशा मजकुराच्या रामराजे ज्ञानदेव देवगुडे (व्यवसाय-नेट कॅफे कामगार) रा. घाटंग्री, ता.उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरीलआरोपीविरुध्द पोलीस ठाणे, आनंदनगर येथे भा.दं.वि. कलम 302, 504 प्रमाणे गुन्हा दि.06.09.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपी विनोद लंगळे फरार झाला होता. मात्र, काही तासांत आरोपीने स्वत:हुन पोलिसांच्या हवाली केले. आरोपी विनोद लंगळे यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी उस्मानाबाद शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
दशरथ पवार याच्या खुनानंतर नातलगांनी शहर ठाण्यात आरोपीवरील कडक कारवाईसाठी मोठा अाक्रोश केला. तसेच घटनेच्या पार्श्वभूमीवर कॅफेच्या बाहेर शनिवारीही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी शवविच्छेदन करून ११.३० वाजेच्या सुमारास घाटंग्री येथे दशरथ पवार यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments