कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात निवेदन



कळंब- केंद्र सरकारने संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलची अन्यायकारक वाढ करून सामान्य जनतेची लूट चालवली ती तात्काळ रद्द करण्यात यावी यासाठी कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी कळंब यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,सन 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव ज्यावेळी 140 डॉलर प्रती बॅरल होते त्यावेळी देशात पेट्रोल 80 रूपये लिटर होते व डिझेल 68 रुपये लिटर विकले जात होते.आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत ३० ते ४० डॉलर प्रती बॅरल एवढी खाली आलेली असताना सुद्धा केंद्र शासनाने त्यावर भरमसाठ दरवाढ करून पेट्रोल-डिझेलच्या अधिक दरवाढ करून सामान्य जनतेची लूट चालवली आहे. त्यामुळे देशात महागाई देखील वाढली आहे ही महागाई कमी करण्यासाठी व सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल-डिझेलची अन्यायकारक भाववाढ रद्द करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

  या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील,डॉ.संजय कांबळे,उपसभापती गुणवंत पवार, नगरसेवक श्रीधर भवर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॕड.प्रवीण यादव,अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष तारेख मिर्झा,भास्कर खोसे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शंतनु खंदारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस मुसेद्दिक काझी,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद चाऊस,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश टेकाळे,सचिन गायकवाड, किरण मस्के, शहजान शिकलगार,शोभा मस्के, नगरसेवक रुकसाना बागवान, सुफैय्या सौदागर,आनंद कुचेकर,हर्षवर्धन पाटील,रणजित घुले, दत्तात्रय कोल्हे,इम्रान सय्यद यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.



Post a Comment

0 Comments