मराठा समाज निर्भयाच्या ऋणात : टेळे - पाटील
कळंब : कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणांमध्ये निष्पाप बळी गेलेल्या अल्पवयीन निर्भयाच्या बलिदानामुळे मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र येऊन जागृत झाला आहे. निर्भयाचे बलिदान मराठा समाज कधीच विसरू शकत नाही. मराठा समाज निर्भयाच्या सदैव ऋणात असणार आहे. कोपर्डी सारख्या घटना कोणत्याही समाजामध्ये घडू नये, यासाठी मराठा समाज कायम पालकत्वाच्या भूमिकेने समाजकंटक व समाजविघातक वृत्तीच्या विरोधामध्ये उभा आहे. असे मत,मराठा क्रांती मोर्चा समन्वयक महेश टेळेपाटील यांनी व्यक्त केले.


     मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि जिल्हा परिषद प्रशाला दाभा यांच्या संयुक्त विद्यमानाने कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणांमध्ये बळी गेलेल्या निर्भयाच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण आणि श्रमदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक तथा मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थापक महेश टेळेपाटील, शिव क्रांतीवीर शिवशंकर होनराव, जिल्हा परिषद प्रशाला मुख्याध्यापक आरएस कापसे, पोलीस पाटील रावसाहेब टेळे,संदीपान जाधव, रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष सचिन टेळेपाटील, भैरवनाथ सावंत, प्रदीप टेळे, तात्यासाहेब वाघमारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना महेश टेळे पाटील म्हणाले," 13 जुलै 2016 रोजी अशी घटना घडली की, चार वर्षांपूर्वीसंपूर्ण देश हादरला. कोपर्डी गावांमध्ये अल्‍पवयीन आणि निष्पाप मुलीवर झालेल्या अन्याय-अत्याचारामुळे माणुसकीला आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा काळीमा फासला गेला. अशा घटना घडू नयेत यासाठी बहुजन महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास समाजातील युवा पिढीला दिशादर्शक आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी बेटी बचाव,बेटी पढाओ असा नारा दिला जातो. परंतु,अपने बेटे को भी समजाओ असा नवीन नारा निर्माण होणे ही काळाची गरज आहे.


   कोपर्डी प्रकरणातील निर्भयाच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची शपथ घेत श्रमदान करीत श्रद्धांजली देण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापक समाजहित व सामाजिक जबाबदारीच्या भावनेने सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटाइझर बाबतच्या शक्य तेवढे पालन करीत मोजक्या, स्थानिक लोकांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांना वृक्षांची रोपे भेट देण्यात आली. यावेळी बबलू वाघमारे, महादेव मस्के, नानासाहेब टेळे,काशिनाथ स्वामी, खंडू शेवते, दीपक बिभीषण टेळे, यश रावसाहेब टेळे, शिक्षक जाधव आरए, गिराम एसआर, गोरे एबी,आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मडके पीएस यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती इंगोले ए बी यांनी के

Post a Comment

0 Comments