थाटामाटात विवाह सोहळा : वधूपिता निघाला कोरोना पॉजिटीव्ह

सांगवी  ( राळे) गावात आतापर्यंत १८ जण कोरोना पॉजिटीव्ह भूम : तालुक्यातील सांगवी  ( राळे)  येथे थाटामाटात विवाह सोहळा पार पडणारा वधूपिता कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. तसेच या गावात जवळपास १८ जणांना कोरोनाने घेरले आहे. पोलिसांनी पंधरा दिवसानंतर  विनापरवाना विवाह सोहळा आयोजीत करुन गर्दी जमवली म्हणून  गुन्हा नोंद केला आहे.


लॉकडाऊन असताना देखील कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दोनशेहुन अधिक वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक एकत्र करत राळेसांगवी या गावातच मोठ्या थाटामाटात झाला होता. विवाह सोहळा झाल्यानंतर चार दिवसानी मुलाचे वडील तनपुरे यांना त्रास होऊ लागल्याने मुलीचे वडील दत्तात्रय टाळके भूम येथे दवाखन्यात घेऊन आले होते. यावेळी तनपुरे व टाळके यांना कोव्हीड सेंटरमध्ये क्वारांटाईन करण्यात आले. दि. ३ जुलै रोजी दोघांचे स्वॅब घेण्यात आले. यानंतर दि. ५ जुलै रोजी मुलीच्या वडिलांचा आहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लग्न समारंभाला उपस्थित असलेल्यांमध्ये धाकधूक वाढली. यानंतर त्यांच्या संपर्कातील साठ ते सत्तर जणांची यादी काढून क्वारंटाईन करून स्वॅब घेतले यामध्ये १७ जणांचे आहवाल कोरोना पॉझिटीव आले. राळेसांगवीची कोरोनाची संख्या १ वरून १८वर जाऊन पोहचली. आणखी यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेतले असून त्यांचे अहवाल येणे शिल्लक आहे. कोविड- 19 साथीमुळे विवाह सोहळ्याच्या आयोजनास जिल्हा प्रशासनाची परवानगी व व्यक्तींची संख्या निश्चीती- बंधनकारक करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करुन दत्ता पुंडलीक टाळके, वय 47 वर्षे, रा. सांगवी (राळे), ता. भुम यांनी दि. 29.06.2020 रोजी दुपारी 12.00 वा. मौजे सांगवी (राळे) येथे विवाह सोहळ्याचे आयोजन केले. तसेच सोहळ्यात उपस्थितांची गर्दी निर्माण करुन कोविड- 19 आजाराच्या संसर्गाची शक्यता निर्माण केली. यावरुन संबंधीत गावच्या ग्रामसेविका- श्रीमती सुषमा गणेश स्वामी यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दत्ता टाळके यांच्याविरुध्द पो.ठा. भुम येथे दि. 14.07.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.Post a Comment

0 Comments