शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा         उस्मानाबाद - महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 डिसेंबर 2019  शासन निर्णयाअन्वये राज्यातील  शेतकऱ्यासाठी  महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेची  अंमलबजावणी चालू आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 68 हजार 302 लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी दिनांक 20 जुलैपर्यत 63 हजार 269 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले आहे. त्यापैकी 57 हजार 907 शेतकऱ्यांचे  कर्ज खात्यावर  433 कोटी एक लाख रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. आज रोजी 5 हजार 33 लाभार्थ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण करुन घेतलेले नाही. आधार प्रमाणिकरण झाल्याशिवाय त्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम वर्ग करण्यात येणार नाही.   

         शासनाने दिनांक 17 जुलै 2020 च्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी 585 कोटी 32 लाख रुपयाचा निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी  सामाजिक अंतर (Social Distance) चे पालन करुन आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबधित बँक शाखेशी संपर्क साधून तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, उस्मानाबाद व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments