गुणपडताळणी, उत्तरपत्रिका मागवण्याची,ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू...उस्मानाबाद (राहूल शिंदे)  - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल कालच जाहीर झाला आहे. काही विद्यार्थ्यांनी समाधानकारक मार्क मिळाले तर काही विद्यार्थी मूल्यांकनावर समाधानी नाहीत.चांगला अभ्यास करून,पेपर सुध्दा चांगले सोडवले,परंतू त्या तुलनेत मार्क चांगले नाहीत मिळाले असे असमाधानी विद्यार्थ्यांसाठी, ऑनलाइन निकालानंतर शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तपत्रिकांची छापिल प्रत, पूनर्मूल्यांकन किंवा स्थलांतरीत प्रमाणपत्र हवे असल्यास त्यासाठी बोर्डाच्या ऑफिसमध्ये न येता ऑनलाइन प्रक्रिया करावी लागणार आहे.

कोरोना-19 व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व प्रक्रिया ऑनलाइन स्वरुपात करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी https://verification.mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन सूचना आणि अटी वाचाव्यात. या वेबसाईटवर आपण आपल्याला हवी असणारी उत्तरपत्रिकेची माहिती घेऊ शकता.गुणपडताळणीसाठी 17 ते 27 जुलैचा कालावधी देण्यात आला आहे. या काळामध्ये अर्ज करणं आवश्यक आहे. आपल्या उत्तरप्रत्रिकेची प्रत हवी असल्यास पोस्टानं, ई-मेलद्वारे, रजिस्टर पोस्टानं पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 17 जुलै ते 05 ऑगस्टपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. या काळामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पैसे भरून उत्तरपत्रिकेसाठी अर्ज करायचा आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.Post a Comment

0 Comments