विविध व्यवसायासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध : लाभ घेण्याचे आवाहन


          उस्मानाबाद -  आदिवासी युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या मूळ उद्देशाने राष्ट्रीयकृत बँक मार्जीन मनी योजनअंतर्गत विविध व्यवसायासाठी जुन्नर येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ  शाखा कार्यालयास सन 2020-21 साठी लक्षांक प्राप्त झाला आहे. लक्षांक तक्ता जिल्हानिहाय व योजनानिहाय खालीलप्रमाणे  आहे.


एक लाख रुपयाच्या आतील प्रकल्प खर्च असलेल्या  कोणत्याही  व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात पिठ गिरणी-02, पेपर डिश बनवणे, ज्युस सेंटर-02, तंबु सजावट, लाऊड स्पीकर केंद्र-03, थ्रेशर युनिट संख्या-02,ऑटो वर्कशॉप-05, किराणा दुकान-05, कापड दुकान-02, इलेक्ट्रिक दुकान-02, खाद्य उद्योग (पापड मसाला शेवया-03, कटलरी दुकान-03 अशा एकूण-29 व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


          तसेच उस्मानाबाद कापड दुकान, साडी दुकान-05, DTP संगणक, झेरॉक्स -02, हॉटेल ढाबा-05, जनरल स्टोअर, स्टेशनरी -05, खते बियाणे दुकान-02, ट्रॅक्टर ट्रॉली-02, दुग्ध व्यवसाय युनिट संख्या-10, मालवाहू मिनी ट्रक-02, प्रवासी वाहन-02, मालवाहु रिक्षा-02, औषधी दुकान-02 अशा एकूण 39 व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचा उस्मानाबाद जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय, जुन्नर(पुणे) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments