उस्मानाबाद - महाराष्ट्र शासना द्वारे आयोजित वृक्षारोपण पंधरवाडा याचे औचित्य साधत जिल्हा कोषागार कार्यालय द्वारे 300 रोपांची वृक्षार...
उस्मानाबाद - महाराष्ट्र शासना द्वारे आयोजित वृक्षारोपण पंधरवाडा याचे औचित्य साधत जिल्हा कोषागार कार्यालय द्वारे 300 रोपांची वृक्षारोपण कोषागार कार्यालय परिसर व शासकीय तंत्र प्रशाला आवारात करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षी कार्यालयात देण्यात आलेल्या 300 झाडांची लागवड पूर्ण करण्यात आली.
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या सूचनेनुसार शासकीय तंत्रनिकेतन प्रशाला उस्मानाबाद येथील लागवडीसाठी जागा प्राचार्य श्री. सूर्यवंशी यांनी उपलब्ध करून दिल्याने सन 2020-21 चे 300 वृक्षांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे या वेळी कडुलिंब, आवळा, चिंच, सप्तपर्णी, सीताफळ, आंबा, अशा औषधी वृक्षासह फळ व फुलझाडे लावण्यात आली चिंच, कवठ, सिताफळ, कडुलिंब, व सप्तपर्णी तसेच विविध वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सूनील पसरटे जिल्हा कोषागार अधिकारी सचिन संदिपान इगे परिविक्षाधीन अप्पर कोषागार अधिकारी अमोल दशरथ आमले तंत्र प्रशालेचे श्री. पिसे श्री. अडसूळ तसेच कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
तहसील कार्यालयाकडून औदयोगिक प्रशिक्षण संस्था परिसरात वृक्षारोपण
दि.1 जुलै 2020 ते 15 जुलै 2020 या कालावधीत वृक्ष लागवड पंधरवाडा साजरा करण्यात येणार असुन दिः-25 जून 2020 रोजी औदयोगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे महाश्रमदान करुन खडडे खोदण्यात आले होते. त्यानुसार दि 10 जूलै 2020 रोजी महसुल विभाग व वन विभागाच्या वतीने औदयोगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथील परिसरात चिंच, सागर, सिताफळ, जांभुळ, बांबु इ.वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सदर वृक्षारोपण निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार गणेश माळी, वन परिक्षेञ अधिकारी श्री. पवार, प्राचार्य श्री. सुर्यवंशी, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे , प्रियंका लोखंडे, श्री. बोथीकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील कर्मचारी तहसील कार्यालय व औदयोगिक प्रशिक्षण संस्था येथील कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी साडे सहाशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
COMMENTS