कंटेन्मेंट झोन मध्ये प्रवेश करणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल
उस्मानाबाद -  उस्मानाबाद शहरातील काळा मारुती चौक परिसरात कोरोना रुग्ण आढुन आल्याने तो परिसर प्रशासनाद्वारे कंटेन्टमेंट झोन घोषीत करण्यात आला आहे. पो.ठा. उस्मानाबाद (श.) चे पोना- सायलु बिरमवार हे नगरपरिषदेच्या मदतीने दि. 09.07.2020 रोजी कंटेन्टमेंट झोन परिसरात लाकडी अडथळे (बॅरिकेड्स) उभारत होते. यावेळी लखन सतिश ओव्हळ, रा. उस्मानाबाद यांनी त्या ठिकाणाहुन पुढे जायचे असल्याचे सांगीतले. त्यावर बिरमवार यांनी सदर भाग हा कंटेन्मेंट झोन म्हणुन घोषीत केला असुन दुसऱ्या मार्गाने जाण्यास सुचविले. त्यावर नमूद व्यक्तीने बिरमवार यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन कंटेन्मेंट झोन मध्ये प्रवेश केला. यावरुन पोना- बिरमवार यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन लखन ओव्हळ यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments