वाशी तालुक्यातील गावा गावा मध्ये कोरोना व्हायरस विषयी जनजागृती
तेरखेडा -  वाशी तालुक्यात नेहरू युवा केंद्र ( भारत सरकार ) उस्मानाबाद यांच्या वतीने गावा गावा मध्ये कोरोना व्हायरस विषयी पोस्टर व स्टिकर लावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना याविषयी योग्य काळजी घेण्याची गरज असून, त्याविषयी जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील तहसील कार्यालय तसेच गावा गावामधील दवाखाना, बस स्टँड, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, बँक, पिक विमा केंद्र, किराणा दुकान, हाॅटेल व चौक होणार्‍या गर्दीच्या ठिकाणी पोस्टर व स्टिकर लावून कोरोना व्हायरस विषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. 

गर्दीच्या ठिकाणी न जाणे,शासनाच्या सुचनांचे पालन करणे, साबण व पाणी वापरून हात स्वच्छ धुणे, बाहेर जातांना मास्क वापरणे, शिंकताना व खोकतांना रुमालाचा वापर करावा, प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी रोज योग प्राणायाम करावा असे पोस्टर लावून जनजागृती करण्यात येत आहे. ही जनजागृती मोहीम नेहरू युवा केंद्राचे वाशी तालुका समन्वयक सुधीर घोलप यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत आहे.  

Post a Comment

0 Comments