येडशीमध्ये क्वारंटाइन व्यक्तीची विष प्राशन करून आत्महत्यायेडशी - येडशी येथील क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीने विष प्राशन करून केली आत्महत्या केल्याने खळबळ  उडाली आहे. या तरुणाने नेमकी आत्महत्या का केली याचे ही कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही.

येडशी गावातील सरपंच यांच्यासह बार्शी तालुक्यातील पांगरी गावातील 3 जण व येडशी गावातील 6 जण असे 9 जण हे पास काढून तिरुपती दर्शनासाठी गेले होते. गावात परत येताच या 6 लोकांना गावातील जिल्हापरिषद च्या शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते.

मात्र, तीन दिवसांपूर्वी यातील एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली.  त्याला तात्काळ  उस्मानाबाद येथील प्लस  येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र तब्येत खालावल्याने त्याला पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले असता त्याचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरती अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

एक तर मंदीर बंद असताना हे देवदर्शनासाठी कसे गेले? त्यांना पास कसा मिळाला? आणि त्यातच रुग्ण हा क्वारंटाइन असताना त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे त्याला विष कुठून मिळाले.  या सारखे अनेक प्रश्न उपस्थिती झाले आहे.  या तरुणाने नेमकी आत्महत्या का केली याचे ही कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही.

Post a Comment

0 Comments