पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या उस्मानाबादच्या प्रेमवीराला पोलीस कस्टडीउस्मानाबाद - पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडून तिच्यासाठी थेट पाकिस्तानला निघालेल्या उस्मानाबादच्या प्रेमविराला कच्छमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे तसेच त्याच्यावर देशाची सीमा बेकायदेशीर ओलांडली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा प्रेमवीर पोलीस कस्टडी मध्ये असून, उस्मानाबादचे पथक वापस आले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दिली.उस्मानाबादचा तरुण   झिशान सिद्दिकी पाकिस्तानमधील तरुणीच्या प्रेमात पडला होता,   सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या प्रेमाला मूर्त रूप देण्यासाठी व त्या तरुणीला भेटण्यासाठी हा तरुण चक्क दुचाकी घेऊनच पाकिस्तानला निघाला होता. पण सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी सीमेवर मागील आठवड्यात 11 तारखेला गुरुवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले.सलीम सिद्दीकी या मुलांच्या वडिलाने आपला मुलगा हरवला असल्याची तक्रार उस्मानाबाद शहर पोलिसात दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला व त्याचे सोशल मीडियावर अकाउंट चेक केले असता तो पाकिस्तान मुलीच्या प्रेमात असल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता तो तिला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेला असल्याचे पोलिसांना समजले. उस्मानाबाद पोलिसांनी त्यांनी तात्काळ लोकेशन ट्रेस करत गुजरातमधील कच्छ पोलिसांनीशी संपर्क केला. रात्री त्याला पाकिस्तानमधील सीमेमध्ये प्रवेश करत असताना त्याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचं कळालं.

त्यानंतर या पठ्ठ्याला आणायला उस्मानाबाद पोलीस देखील गेले. पण, त्याला ताब्यात घेता आले नाही. कोरोनाच्या काळात सगळं लॉकडाउन असताना हा तरुण थेट भारत पाकिस्तान सीमेपर्यंत गेला कसा का आणखी काही या कथेला जोडणारा वेगळा दुवा आहे का याच ही तपास दोन्ही पोलीस करत आहेत.

उस्मानाबादचे पोलीस या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेले होते.
 पण रिकाम्या हाताने मागे परतावे लागले


उस्मानाबादच्या या प्रेमविराला कच्छमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. उस्मानाबादचे पोलीस या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेले होते.  पण रिकाम्या हाताने मागे परतावे लागले आहे. या तरुणाने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याने कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरोधा कलम 3 (1)(6)नुसार तसंच कलम 188नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाइन केल्यामुळे पुढील 14 दिवस या पठ्ठ्याचा मुक्काम हा कच्छमध्येच असणार आहे.

Post a Comment

0 Comments