उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील खाजानगर भागात राहणाऱ्या एका तरुणाचे पाकिस्तानमधील एका मुलीशी सोशल मीडियावरून प्रेमसंबंध जुळले होते. तिच्...
उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील खाजानगर भागात राहणाऱ्या एका तरुणाचे पाकिस्तानमधील एका मुलीशी सोशल मीडियावरून प्रेमसंबंध जुळले होते. तिच्यासाठी तो कधी सायकलवरून तर कधी पायी चालत पाकिस्तानकडे निघाला होता, पण गुजरातमधील कच्छजवळ भारत - पाकिस्तान सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) पकडले होते. त्यानंतर त्याच्याबद्दल शंका-कुशंका काढल्या जात होत्या, त्यावर उस्मानाबाद पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी प्रेस नोट जारी करून म्हटले आहे की,उस्मानाबाद शहरातील 20 वर्षीय अभियंता तरुण दि. 11.07.2020 रोजी सकाळी 09.00 वा. सु. घराबाहेर पडला परंतु तो घरी परतला नाही. यावर त्याच्या कुटूंबीयांनी सायंकाळीच पो.ठा. शहर गाठून तो बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार नोंदवली. ही हकीकत पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना समजताच त्यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पो.ठा. यांना संबंधीत तरुणाचा शोध घेण्यास सांगीतले.
यावर पोलीस पथकाने त्या तरुणाचे सोशल मिडीया अकाऊंटची सखोल माहिती घेतली असता त्या तरुणाचे तथाकथीत पाकिस्तानी तरुणीशी प्रेमसंबंधाने चॅटींग सुरु असल्याचे व भेटीसाठी ती तरुणी त्याला पाकिस्तानात बोलवत असल्याचे निदर्शनास आले. उस्मानाबाद पोलीसांनी सायबर पो.ठा. उस्मानाबाद च्या मदतीने त्याच्या मोबाईल फोनची माहिती घेउन त्याचा ठावठिकाणा प्राप्त केला. यावर तो तरुण कच्छ (गुजरात) परिसरात असल्याची माहिती मिळाली.
ही हकीकत पोलीस अधीक्षक यांनी कच्छ (पुर्व) चे पोलीस अधीक्षक व इतर तपास यंत्रणांना कळवून त्यांच्याशी चर्चा केली. उस्मानाबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीवरुन सर्व यंत्रणा सतर्क झाल्या.काल दि. 16.07.2020 रोजी तो तरुण कच्छच्या वाळवंटातून मोटारसायकल घेउन जात असतांना मो.सा. वाळूत फसल्याने त्याने ती जागीच सोडून देउन पाकिस्तान सीमेच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला. दुपारी 16.00 वा. सु. त्याची बेवारस मो.सा. बीएसएफ च्या गस्ती पथकास आढळली. तर रात्री 22.00 वा. सु. तो तरुण बीएसएफ पथकास आढळला. तो तरुण सध्या बीएसएफ बटालीयन क्र. 150 च्या ताब्यात असुन त्याला ताब्यात घेण्याकामी उस्मानाबाद पोलीसांचे पथक रवाना झाले आहे.
अशा प्रकारे पोलीस अधीक्षक यांनी वेगाने पाठपुरावा केल्याने कच्छ पोलीस व बीएसएफ यांच्या सहकार्याने त्या बेपत्ता तरुणाचा शोध लागला. मुलाचा शोध लागल्याने त्याच्या कुटूंबीयांनी भारावून जाउन पोलीस अधीक्षक सो. व उस्मानाबाद पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहेत.
COMMENTS