उस्मानाबादेत सात दिवसाची संचारबंदी
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहर तसेच नगर परिषद क्षेत्रात सात दिवस संचारबंदी करण्यात  येणार आहे. ही संचारबंदी १३ जुलै ते १७ जुलै दरम्यान राहणार आहे. या संचारबंदीचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी जारी केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने या काळात बंद राहणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणत शिरकाव केला आहे. कोरोनाने तीनशेचा आकडा पार केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३३ रुग्ण निघाले आहेत. पैकी १४ जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हात १०६ एक्टीव्ह रुग्ण आहेत.

लॉकडाऊन : रविवार ऐवजी शनिवार ठरला आत्मघातकी निर्णय !

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी रविवारी लॉकडाऊन केले जात होते. मात्र गेल्या आठवड्यापासून रविवारी ऐवजी   शनिवारी लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे या आठ्वडूयात जिल्ह्यात विशेषतः उस्मानाबाद शहरात मोठया प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. हा निर्णय आत्मघातकी असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.


रविवारी लोक मोठ्या प्रमाणत बाजारात येऊन गर्दी केल्याने तसेच कोणतेही सामाजिक अंतर न  पाळल्याने कोरोना वाढत आहे. लोक कोरोना गंभीर घेत नसल्याने रुग्ण वाढत आहेत आणि त्याचा ताण आरोग्य आणि पोलीस यंत्रणेवर येत आहे.


बँका आणि अन्य कार्यालयातील  गर्दी अंगलट 

महिन्याच्या  पहिल्या सोमवारी बँका तसेच अन्य कार्यालयात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर न पाळणे, मास्क न घालणे आदीमुळे कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. 

Post a Comment

0 Comments