अणदूर येथे शेतजमिनीच्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामारीनळदुर्ग: दिपक घोडके रा. अणदुर, ता. तुळजापूर यांनी गावातील आपली शेतजमीन मोजणीकामी दि. 15.07.2020 रोजी भुमी अभिलेख पथकास बोलावले होते. ही मोजणी चालू असतांना खुंट्या लावण्याच्या कारणावरुन शेजारच्या शेत मालक मुळे कुटूंबीयांशी घोडके कुटूंबीयांचा वाद झाला. यात मुळे कुटूंबातील शशिकांत, दिपक, दिनेश, अरविंद, किरण, राहुल, दिपक व अन्य 3 व्यक्ती व घोडके कुटूंबातील- दिपक, आदित्य, अजिंक्य, अक्षय, अशोक अशा दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी, तलवार, चाकु, लोखंडी गज, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील सदस्यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन परस्परविरोधी गटांविरुध्द भा.दं.सं. कलम- 307, 143, 147, 148, 149, 427, 324, 323, 504, 506 अन्वये पो.ठा. नळदुर्ग येथे स्वतंत्र 2 गुन्हे दि. 16 व 17.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


 परंडा: ऋषीनाथ अंबादास खवले, वय 45 वर्षे, रा. बोडखा, ता. परंडा यांनी गावातील स्वस्त धान्य दुकानाची तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरुन गावातील पाटील कुटूंबीय- सुमीत, राजेंद्र, अमीत, शरद, अमोल यांनी संगणमत करुन दि. 17.07.2020 रोजी 16.15 वा. सु. गावातील मारुती मंदीर परिसरात ऋषीनाथ यांसह अविनाश व मेघनाथ खवले या तीघांना लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या ऋषीनाथ खवले यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जाबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments