कोविड- 19 : उस्मानाबाद पोलीस दलाचा एक गाव- एक पोलीस उपक्रमउस्मानाबाद-  कोविड- 19 रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्या निर्मुलनात पोलीस- जनता साहचर्य भावना आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन  यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक गाव- एक पोलीस तर शहरात एक बीट- एक पोलीस संकल्पना राबवीली जात आहे. त्यास अनुसरुन जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यातील गावांना त्या संबंधीत पोलीस ठाण्यातील किमान 1 पोलीस कर्मचारी नेमण्यात आला आहे. संबंधीत गावाचे व नेमलेल्या पोलीसाचे नाव- मोबाईल फोन क्रमांक याचा तक्ता संबंधीत पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात लावण्यात आला असुन संबंधीत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामसुरक्षा दले, ॲन्टी कोरोना कॉर्प्स, ग्रामस्थ यांच्या व्हाटस्अप गटात प्रसारीत करण्यात आला आहे. या उपक्रमाचा चांगला फायदा होत असुन गावातील कोविड- 19 रोगाशी संबंधीत आवश्यक माहिती प्रशासनास जलद गतीने उपलब्ध होत आहे.

एक गाव- एक पोलीस उपक्रमाची उद्दीष्टे.
1) संबंधीत गावात कोविड- 19 संसर्ग, संशयीत रुग्ण इत्यादी संबंधी अद्ययावत माहिती घेणे.
2) परजिल्ह्यातून विनापरवाना गावात आलेल्या लोकांची माहिती घेणे.
3) राहत्या घरी- संस्थात्मक कॉरंटाईन करण्यात आलेल्या लोकांच्या हालचालींची माहिती घेणे.
4) कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांची गावात यशस्वी अंमलबजावणी करणे.
5) ग्रामस्थ, ग्रामसुरक्षा दले, ॲन्टी कोरोना कॉर्प्स, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभाग  
     यांच्याशी समन्वय साधुन कोविड- 19 निर्मुलनाचे काम करणे.
6) एक गाव- एक पोलीस योजनेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली पोलीस ठाण्यातील नित्याची कामे करुन  
     सप्ताहात किमान तीन वेळा संबंधीत गावात जाउन जनसंपर्क साधने अपेक्षीत आहे.

Post a Comment

0 Comments