गावात कडेकोट बंदोबस्त परंडा (राहूल शिंदे) - तालुक्यातील शेळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे नुकतेच नियुक्त झालेले बँक मॅ...
गावात कडेकोट बंदोबस्त
परंडा (राहूल शिंदे) - तालुक्यातील शेळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे नुकतेच नियुक्त झालेले बँक मॅनेजरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यांच्या स्वाबचे नमुने सह्याद्री हॉस्पिटल, पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते.ते काल पॉझिटिव्ह आढळून आले.सध्या ते विश्वराज हॉस्पिटल दौंड येथे उपचार घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर गावात आज तहसीलदार ,बीडीओ ,आंबी पोलीसस्टेशनचे ए.पी.आय पालवे यांनी भेट देऊन गावचा आढावा घेतला व संपूर्ण गाव तीन दिवसांसाठी कडेकोट बंद करण्यात आले आहे.सदर व्यक्तीच्या संपर्कातील पाच व्यक्तींना स्वाब तपासणी करण्यासाठी परंडा येथे पाठवण्यात आले आहे.उद्या रात्रीपर्यंत किंवा परवा पर्यंत रिपोर्ट येणे अपेक्षीत आहे.सदर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ठाणे रिटर्न असून करमाळा येथे वास्तव्यास आहे.
शेतकऱ्यांची सध्या पीक कर्ज व पीक विमा भरण्यासाठी बँकेत लगभग सुरू आहे.प्रशासनाने बँकेत तात्काळ दुसऱ्या कर्मचाऱ्याची नेमणूक करून बँकिंग सेवा सुरळीत करावी. जेणेकरून शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.असे अहवान शेतकरी वर्ग करत आहे.
यावेळी डॉ.भोसले , सरपंच-बप्पा दैन.ग्रामसेवक, बाबु दैन,तलाठी, पोलीसपाटील,पंचायत समिती सभापती सतीष दैन,पंचायत समिती सदस्य सतीष देवकर आदी उपस्थितीत होते.आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजनाची अमलबजावणी करावी व प्रशासनाला सहकार्य करावे.नागरिकांनी घाबरून न जाता घरीच सुरक्षीत रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
खुप अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे या कोरोना महामारी मुळे.
ReplyDelete