कोरोना ; कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई - जिल्हाधिकारी          उस्मानाबाद -उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात न्यायाधीश अथवा त्यांचे प्रतिनिधी कोणत्याही CCC (Covid Care Center), क्वारन्टाईन सेंटर्स, अलगीकरण कक्ष (Isolation Ward), व प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) यांना अचानक भेटी देणार  आहेत. या भेटीमध्ये वरील ठिकाणी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी अनुपस्थित असल्यास अथवा आपले कामकाज व्यवस्थितरित्या बजावत नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल व त्यांचे विरुद्ध फौजदारी कार्यवाहीसह त्यांना सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे.

          त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा  दिपा मुधोळ-मुंडे  यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे राबविण्याचे अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कोविड-19 चे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने त्यांना नेमून देण्यात आलेले कर्तव्य नियमितपणे उपस्थित राहून चोखपणे पार पाडावे. नेमून दिलेल्या कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्यास अथवा त्यामध्ये कसलाही निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, कामचुकारपणा केल्याचे अथवा कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्यास अशा अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम,2020 तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाईसह त्यांना सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल. याबाबत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी नोंद घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी हे परिपत्रक आपले अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचारी याच्या निदर्शनास आणून द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे दिले आहेत.

          उस्मानाबाद -उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात न्यायाधीश अथवा त्यांचे प्रतिनिधी कोणत्याही CCC (Covid Care Center), क्वारन्टाईन सेंटर्स, अलगीकरण कक्ष (Isolation Ward), व प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) यांना अचानक भेटी देणार  आहेत. या भेटीमध्ये वरील ठिकाणी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी अनुपस्थित असल्यास अथवा आपले कामकाज व्यवस्थितरित्या बजावत नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल व त्यांचे विरुद्ध फौजदारी कार्यवाहीसह त्यांना सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे.

          त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा  दिपा मुधोळ-मुंडे  यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे राबविण्याचे अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कोविड-19 चे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने त्यांना नेमून देण्यात आलेले कर्तव्य नियमितपणे उपस्थित राहून चोखपणे पार पाडावे. नेमून दिलेल्या कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्यास अथवा त्यामध्ये कसलाही निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, कामचुकारपणा केल्याचे अथवा कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्यास अशा अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम,2020 तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाईसह त्यांना सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल. याबाबत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी नोंद घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी हे परिपत्रक आपले अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचारी याच्या निदर्शनास आणून द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे दिले आहेत.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वधर्मिय धार्मिक स्थळाचे ठिकाणी तसेच लग्न समारंभ किंवा इतर सामुदायिक कार्यक्रमाचे ठिकाणी नागरिक एकत्रित जमा होणार नाहीत, याची गांर्भीयाने दक्षता घेणे आवश्यक आहे. सध्या श्रावण महिन्यामध्ये सोमवार व इतर दिवशी महादेव मंदिरात व इतर मंदिरामध्ये तसेच बकरी ईद सणानिमित्त मस्जीदीमध्ये नागरिक एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण होणार आहे.

          त्यामुळे भूम तालुक्यामध्ये श्रावण महिन्यामधील सोमवारी किंवा इतर दिवशी महादेवाच्या मंदिरात किंवा इतर देवताचे मंदिरात नागरिकांनी एकत्रित येवून पुजा-अर्चा करु नये. तसेच बकरी ईद सणानिमित्त मुस्लीम बांधवांनी मस्जीदमध्ये एकत्रित येवून नमाज पठण करु नये. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी भूम शहरातील आणि गटविकास अधिकारी यांनी  ग्रामीण भागातील सर्व मंदिर व मस्जीदीमध्ये नागरिक एकत्रित येणार नाहीत  यासाठी उपाय योजना करावी. असे असतांनाही मंदिर व मस्जीदमध्ये एकत्रित जमाव झालेला दिसून आल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ रोग अधिनियम 1897 व भारतीय दंडसंहिता 1860 नुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, भूम व तहसिलदार भूम  यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments