सुशांत सिंह राजपूत प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - ॲड रेवण भोसले
उस्मानाबाद - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपूर्द करून देशातील लोकभावनेची दखल घेतली आहे.  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे वारंवार उलट सुलट याप्रकरणात विधान करून राज्यातील जनतेची दिशाभूल करत होते. त्यामुळे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा देण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

   सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत असल्यामुळे सर्व स्तरातून सर्वांनी सीबीआय तपासाची मागणी केली .महाविकास आघाडीचे नेते टीव्ही चॅनेल समोर वेगवेगळी विधाने केल्यामुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

        सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपविलेमुळे या देशात कायद्याचे राज्य असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र सरकार राज्यामध्ये जंगलराज पुन्हा स्थापन करण्याचे प्रयत्न करत आहे परंतु महाराष्ट्राची जनता या महाविकास आघाडीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट मत ऍड. भोसले यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments