मुरुम नगर पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू     उस्मानाबाद- महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम, २०२० प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. ३ नुसार करोना विषाणुमुळे (COVID-१९) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.

            कोरोना विषाणू कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत आहेत.त्या अनुषंगाने शासनाने राज्यात लॉकडाऊन  दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत  वाढविण्यात आलेला आहे.  लॉकडाऊनमधील निर्बंधाची सुलभता आणि लॉकडाऊन टप्पानिहाय उघडणे (Easing of restrictions and phase wise opening of  lockdown Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

    त्याअर्थी,उस्मानाबाद जिल्हयातील मुरुम नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करणे व त्यावर नियंत्रण आणण्याची कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे.त्याकरिता कोरोना कोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी मुरुम नगर पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करणे आवश्यक झाले असल्याची माझी खात्री झाली आहे.

    त्याअर्थी मी जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे उस्मानाबाद फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3),साथरोग अधिनियम 1897 च्या कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या सर्व संबंधित तरतुदी अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन संपुर्ण  मुरुम नगर पालिका क्षेत्रात दि.02 ऑगस्ट 2020 च्या 00.00 वाजेपासून ते दि.10 ऑगस्ट 2020  च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करीत आहे.या कालावधीत नागरिकांना अनावश्यकरित्या घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे.या कालावधीत करोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायोजना एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील मुरुम नगर पालिका क्षेत्रातील खालील आस्थापना वगळून उर्वरित आस्थापना बंद राहतील.

1.फिरते दुध विक्रेते यांच्या मार्फत घरपोच दुध/दुध पाकीटांची विक्री/वितरण करता येईल परंतु एका ठिकाणी उभे राहुन दुध विक्री करता येणार नाही.घरपोच दुध/दुध पाकिटे वाटपाच्यावेळी कोरोना विषाणू कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच घरपोच दुध विक्रीची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 12.00 पर्यंत राहील.

2.सर्व सरकारी व खाजगी रुग्णालये,दवाखाने व त्यांचेशी संलग्न मेडीकल स्टोअर्स चालू राहतील.

3.जार,वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकांकडील उपलब्ध भांडयामधे पाणी दयावे आणि त्यावेळेस सामाजिक अंतराचे पालन करावे.किंवा जार,वॉटर स्पलायर्स यांनी कर्मचारी  यांना त्यांचे ओळखपत्राआधारे परवानगी राहील.

4) घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेल्या कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे.

5) वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा चालु राहतील.

6) सर्व शासकीय कार्यालय व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये सुरु राहतील. या कार्यालयाचे/विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राव्दारे नगर पालिका क्षेत्रात प्रवास करु शकतील.संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक शासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालयांतील कर्मचा-यांची उपस्थिती 10 टक्के राहील.

7) मुरुम नगर पालिका क्षेत्रातील नागरीकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार नाही. तथापी अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात येईल. यासाठी नागरीकांनी  www.covid19.mhpolice.in  या संकेतस्थळावर अर्ज करावा.

8) मुरुम नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरीकांनी कोरोना विषाणुचे अनुषंगाने (ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे आढळुन आल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी.

9) विद्युत सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणा-या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी वाहनांना ओळखपत्राआधारे परवानगी राहील.

10) अंत्यविधीसाठी 10 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील.

11) पेट्रोल / डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवा, मिडीया व वैद्यकीय सेवा देणा-या कर्मचा-यांचा वाहनांना व शासकीय वाहनांसाठीच सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत सुरु राहील. ओळखपत्राची पडताळणी करुनच पेट्रोल / डिझेल वितरित करण्यात यावे. पेट्रोल / डिझेल पंपावर काम करणा-या कर्मचा-यांना पेट्रोल / डिझेल पंप चालकांनी दिलेल्या ओळखपत्राअधारे परवानगी राहील.

 12) किराणा दुकाने व भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत परवानगी राहील.

13) बी बियाणे व खते, किटकनाशके या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने/आस्थापना, बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगीक बियाणे पॅकींग, हाताळणी केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा, कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चालू राहतील.

14)पिकविमा व अंतर्गत कामकाजाकरिता सर्व बँका सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहतील.

15)प्रशासनाच्या पूर्व परवानगी शिवाय कोण-याही धार्मिक/यात्रा मेळावे/लग्न समारंभ/विविध प्रकारचे प्रदर्शने/आठवडी बाजार/जनावरांचे बाजार भरविणे इ. आयोजन करण्यास मनाई करण्यात येत आहे.

      सदरील आदेशाची कडक अमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तीकडुन या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व आरतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.

Post a Comment

0 Comments