कोरोना : प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या      उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये कोरोना कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी समन्वय अधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकारी यांचे नाव, पदनाम आणि त्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

श्रीमती रुपाली आवले, अपर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील कामकाजाचे पर्यवेक्षण व समन्वय करण्याची जबाबदारी दिली आहे.

श्री. शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन मांजरा प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्याकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, उस्मानाबाद येथील कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा येथील पर्यवेक्षण तसेच जिल्ह्यातील  सर्व CCC, DCH, DCHC येथील खाटांची संख्या वाढविण्याच्या कामाचे पर्यवेक्षण व समन्वय करण्याची जबाबदारी दिली आहे.

श्री. अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्याकडे कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कामाचे पर्यवेक्षण व समन्वय करण्याची जबाबदारी दिली आहे.

प्रा. डॉ. धिमधिमे, शरीरक्रिया विभागप्रमुख, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, उस्मानाबाद यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व CCC. DCH, DCHC येथील खाटांची संख्या पुरेशा प्रमाणात असलेबाबत पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

श्री. रेड्डी, अतिरिक्त जिल्हा नियोजन अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयातील खाटांच्या संख्येबाबत पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

श्री. तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्याकडे RTPCR व RAPID ANTIGEN TESTS ट्वारे तपासणी करुन येणाऱ्या रुग्णसंख्येबाबत (Testing Figures) पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

श्री. कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता व पाणीपुरवठा, जि. प. उस्मानाबाद यांच्याकडे गृह विलगीकरण करण्यात आलेल्या कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

श्री. सुसर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्याकडे कोविड-19 च्या अनुषंगाने IEC (जनजागृती)च्या कामकाजाचे पर्यवेक्षण व समन्वय करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

डॉ. गजानन परळीकर, जिल्हा आयुष अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC येथे योगा प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही  करणे व त्याबाबत समन्वय करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

श्री. संजय गटकुल, जिल्हा समन्वयक, महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत योग्य उपचार व योजनेचा लाभ आणि अंमलबजवणी शासन निर्णयाप्रमाणे होते किंवा कसे याची तपासणी करणे, रुग्णालयांकडून रुग्णांवरील औषधोपचारांची  देयके  व्यवस्थितरित्या दिली जातात किंवा कसे याबाबत ऑडीटर यांच्या कामकाजावर पर्यवेक्षण करणे व त्याबाबत समन्वय करण्याची जबाबदारी सोपविली आहे..

          या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

        या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments