कोरोना : दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले
उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १६१३ गेली आहे. पैकी ५३९ बरे झाले असून, उपचाराखाली रुग्णाची संख्या १०१५ आहे. तसेच ५९ जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. 

जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 03/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 175 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 64 असे एकूण 239 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.

🔷 आज दिवसभरात पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात 17 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1613 (* 7 पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वाब डबल प्राप्त झाले होते)
🔹 जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 539
🔹 जिल्ह्यातील एकूण उपचारा खालील रुग्ण - 1015
🔹 जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 59

◼️वरील माहिती. दि  04/08/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.

Post a Comment

0 Comments