सीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे
परंडा (राहूल शिंदे)  -  सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्याचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गुरूवारी पाटंबधारे विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उजनी ते सीना-कोळेगाव जोड कालव्याचे काम सुरू असून ते पाणी बंगाळवाडी येथील सीना नदीच्या पात्रात येणार आहे. बंगाळवाडी, देऊळगाव, काटेवाडी, तांदुळवाडी या माळरानावरून उपसा सिंचनाद्वारे पांढरेवाडी तलावापर्यत कालवा तयार केला गेल्यास परिसरातील जवळपास आठ गावांतील ऐंशी टक्के क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.

या बरोबरच या भागातील काही पाझर तलावात पाणी सोडता येणार आहे. ही योजना कार्यान्वीत झाल्यास या भागातील सिंचनाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

सीना -कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी तलाव उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी देऊळगावचे माजी सरपंच केशव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.१३ ) खासदार राजेनिंबाळकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन केली होती. यावेळी सचिन सुर्यवंशी सर, रविंद्र गाढवे आदी उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती रणजितसिंह पाटील म्हणाले, ही योजना कार्यान्वित झाल्यास या भागातील सिंचनप्रश्न मार्गी लागणार असून यातून माळरानावर हरीतक्रांती होणार आहे. खंडेश्वरवाडी प्रकल्पात देखील यामुळे पाणी येऊ शकते. या योजनेसाठी मंत्री स्तरावरून प्रयत्न करावे लागतील. यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत.

Post a Comment

0 Comments