इच्छुक शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत तुती लागवड करण्यासाठी कृती आराखडा सादर करावा
उस्मानाबाद :- जिल्हा रेशीम कार्यालयाकडून असे आवाहन करण्यात येते की, रेशीम उद्योगासाठी जिल्ह्यात पोषक वातावरण असून हा उद्योग अतिशय कमी पाण्यावर मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारा आहे. या उद्योगासाठी मनरेगा अंतर्गत ३.२६ लक्ष रुपये रक्कम तीन वर्षासाठी अनुदानाचा लाभ देय आहे. यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सन २०२१-२२ साठी मनरेगा अंतर्गत तुती लागवड करण्यासाठी दिनांक १५ ऑगष्टच्या होणाऱ्या ग्रामसभेत अथवा कोविड मुळे सभा न झाल्यास इच्छुक शेतकऱ्यांचे लेखी स्वरुपात अर्ज ग्राम पंचायतीकडे सादर करुन सहभाग नोंदविण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

          तेव्हा एका गावात किमान दहा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा आणि त्याप्रमाणे प्रति लाभार्थी ३.२६ लक्ष रुपये याप्रमाणे ३२.६० लक्षचा कृती आराखडा (Labour Budget) तयार करुन घेणे अपेक्षित आहे. यासाठी  लाभार्थी हा अल्पभूधारक, जॉबकार्ड धारक, ओलीताची  व्यवस्था असलेला  व १८ ते ६० वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी सन २०२०-२१ मध्ये रेशीम उद्योग करण्यासाठी तुती लागवड केलेली आहे. परंतु गाव पातळीवर सन २०२०-२१ च्या कृती आराखड्यात नाव समावेश नाही. त्या लाभार्थ्यांनी त्यांची पण नावे पूरक कृती आराखड्यात समाविष्ठ करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा.

  तेव्हा इच्छुक शेतकऱ्यांनी  मनरेगा अंतर्गत तुती लागवड करण्यासाठी ग्रामसभेत ठराव घेवून त्याबाबतचा कृती आराखडा ग्रामपंचायतमार्फत पंचायत समितीकडे सादर करावा व त्याची  प्रत रेशीम कार्यालयाकडे सादर करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, मजूर फेडरेशन बिल्डींग, उस्मानाबाद दूरध्वनी क्रमांक– ०२४७२-२२३८८५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी  श्रेणी-1, उस्मानाबाद यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments