कोरोना : शेळगाव व परिसरासाठी धोक्याची घंटापरंडा (राहूल शिंदे)  -  परंडा तालुक्यातील शेळगाव येथील  14 व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने  परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.आजपर्यंत शेळगाव येथे कोरोनाचे 21 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत,उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण 2 तर1 जणाचा बळी गेला आहे.सद्यःस्थितीला 18 रुग्ण उपचार घेत आहेत.

शेळगाव मध्ये कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे.परिसरातील चिंचपूर(बु), पांढरेवाडी,तांदूळवडी , काळेवाडी,लोणारवाडी धोत्री, सक्करवाडी,लंगोटवाडी, जेकटेवाडी या खेडेगावाची आवक-जावक मोठ्याप्रमाणात शेळगाव येथे होत असून अनेकजण  पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आले आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक गावाने स्वतः होऊन आपापल्या गावात योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे नागरिकांनी खूपच अत्यावश्यक कामांसाठीच योग्य खबरदारी (मास्क,सीनेटायझरचा वापर,दोन व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतरठेवणे) बाहेर पडणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments