कळंब : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अटकेत

 


 कळंब - पो.ठा. भुम गु.र.क्र. 81 / 2015 भा.दं.सं. कलम- 307, 325 या गुन्ह्यातील आरोपी- बालाजी शिवराम शिंदे, वय 30 वर्षे, रा. पारधी पिढी, मोहा, ता. कळंब हा पोलीसांना तपासकामी हवा होता. स्था.गु.शा. चे पोनि- श्री दगुभाई शेख यांच्या नेतृत्वाखालील सपोनि- श्री आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोना- महेश घुगे, समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने त्यास दि. 26.09.2020 रोजी कळंब शहर परिसरातून ताब्यात घेउन उर्वरीत कार्यवाहीस्तव भुम पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

 

 

मोटार वाहन कायदा अंतर्गत 229 कारवाया- 52,000 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.

उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 25.09.2020 रोजी 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 229 कारवाया करुन 52,000 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

 


मनाई आदेशांचे उल्लंघन 30 पोलीस कारवायांत 8,700/-रु. दंड वसुल.

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि. 24 व 25.09.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 27 कारवायांत- 7,800/- रु. दंड प्राप्त.

2)सार्वजनिक स्थळी मास्क न वापरणे: 1 कारवाईत- 500/- रु. दंड प्राप्त.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 2 कारवायांत 400/-रु. दंड प्राप्त.

 

Post a Comment

0 Comments