केंद्र सरकारच्या नवीन कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळणार - रामदास कोळगे


   उस्मानाबाद - केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेमध्ये मंजूर केलेले तीन विधेयक हे शेतकर्याच्या हिताचे असून यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीची हमी व कृषि प्रक्रिया प्रकल्प मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीत वाढ होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नवीन कृषी  क्षेत्रातील दलाली मोडीत निघणार असल्याचे मत भाजपा किसान मोर्चाच्याचे पूर्व मराठवाडा संपर्क रामदास कोळगे यांनी म्हटले आहे.


श्री कोळगे यांनी आज मंगळवारी (दि.22) रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.   जिल्हाधिकारी यांना दिलेल्या  अभिनंदन पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने घेतलेल्या कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयकामुळे बाजार समितीचे कोणतेही बंधन शेतकऱ्याला राहणार नाही .त्यामुळे शेतकरी आपला शेतमाल प्रक्रिया केंद्र यांना विकू शकतो तसेच आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यापाराला प्रोत्साहन मिळणार आहे .


दुसरे विधयक हे शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण)किंमत कमी व कृषी सेवा करार विधेयक असून यामुळे कृषी प्रक्रिया उद्योजक निर्यात कार मोठे खरेदीदार  शेतकऱ्यांशी शेतमाल खरेदीचा करार करणार असून त्यामुळे पीक लागवडीपूर्वी शेतकऱ्यांना भाव माहित होणार आहे त्यामुळे अधिक उत्पादन त्यामुळे भाव पडण्याची भीती राहणार नाही . कंत्राटी शेती म्हणजे शेतमाल खरेदी बाबतचा असून यामध्ये कुठले शेतकऱ्याची शेती कोणत्याही कंपनीला मिळणार नाही याबाबत विरोधक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत .


तिसरे विधेयक हे अत्यावश्यक वस्तू विधेयक आहे अत्यावश्यक वस्तू मधून कडधान्य तृणधान्य तेलबिया खाद्यातील कांदा व बटाटा वगैरे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील तेजीचा लाभ उठवता येईल तसेच शेती क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक आल्यामुळे प्रक्रिया कारखाने उभारल्याने शेतमालाला अपेक्षित दर मिळणार आहे. गेल्या सत्तर वर्षात शेतक­यांच्या प्रतिक्षेत असलेली ही तीन विधेयके शेतक­यांच्या उत्पन्नात वाढ करणारी आहेत. 


ऐतिहासिक विधेयक लोकसभेत व राज्यसभेत मंजूर करून शेतक­यांना न्याय दिलेला आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व शेतक­यांनी एकमेकांना मिठाई देऊन या निर्णयाचे स्वागत करुन आनंद साजरा करावा. असे आवाहन करीत भाजपा किसान मोर्चा या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर व सर्व मंत्री मंडळातील सदस्यांचे  अभिनंदन करत असल्याचे श्री कोळगे यांनी अभिनंदन पत्रात म्हटले आहे .

Post a Comment

0 Comments