सारोळा : दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून दगडाने मारहाण

 


ढोकी: बाळासाहेब येसाजी सरवदे, वय 65 वर्षे, व उमेश तनमोर, दोघे  रा. सारोळा (भि.), ता. उस्मानाबाद हे दोघे दि. 20.09.2020 रोजी 14.00 वा. सु. पारधी पिढी, सारोळा येथे गेले होते. यावेळी उमेश तनमोर याने बाळासाहेब सरवदे यांच्याकडे दारु पिण्यास पैसे मागितले असता बाळासाहेब यांनी नकार दिला. यावर चिडुन जाउन तनमोर याने बाळासाहेब यांच्या डोक्यात दगड फेकून मारल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अशा मजकुराच्या गोपाळ सरवदे (जखमीचा भाऊ) यांनी दि. 26.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 326 सह ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 

Post a Comment

0 Comments