अणदूर : बायको घटस्फोटीत असल्याचे समजताच नवऱ्याची आत्महत्या नळदुर्ग: लग्न झालेल्या बायकोचा आपल्यासोबतचा दुसरा विवाह असून, बायको घटस्फोटीत असल्याचे समजताच नवऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अणदूर ता. तुळजापूर येथे घडली. 


हरी लक्ष्मण साळुंके, वय 27 वर्षे, रा. अणदुर, ता. तुळजापूर यांनी दि. 23-24 सप्टेंबर या कालावधीत गाव शिवारातील गोलाई पणन येथील झाडास गळफास घेउन आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नीचा यापुर्वीच पहिला विवाह झाला होता. 


ही हकीकत सासु- सासरे व अन्य चौघे व्यक्ती यांनी हरी साळुंके यांच्यापासुन लपवून ठेवली होती. याच फसवणुकीमुळे हरी याने नैराश्याच्या भरात आत्महत्या केली आहे. यामुळे त्याच्या आत्महत्येस सासरकडील 6 लोक जबाबदार आहेत. अशा मजकुराच्या अंबिका वाघमोडे (मयताची बहिण) यांनी दि. 25.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

1 Comments

  1. आत्महत्या हा पर्याय नव्हता... यासाठी अनेक पर्याय निघु शकले असते...

    ReplyDelete