कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणतात, 'शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारकडे पैसे नाहीत ...


औरंगाबाद  -'शेतकऱ्यांच्या  मदतीसाठी सरकारकडे पैसे नाहीत, अशी स्पष्ट कबुली कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी औरंगाबादच्या पीक पाहणी दौऱ्यात दिली. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना  मदत कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील नागद, सायगव्हान येथे शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. यावेळी बोलताना भुसे म्हणाले की येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या त्यांच्याकडे अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाली याची आकडेवारी नाही. मात्र येत्या आठ दिवसात ही आकडेवारी आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात बोलू. 


सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येईल अशी परिस्थिती नाही. शासनाच्या तिजोरीत सध्या पैसा नाही, ही वस्तुस्थिती आहे, असं भुसे म्हणाले. मात्र शेतकऱ्यांना मदतीसाठी वाटेल ते करु पण शेतकऱ्याला मदत करु, असंही ते म्हणाले.र महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढील तीन महिने शेतकऱ्याला मदत करणे शक्य नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.


Post a Comment

0 Comments