उस्मानाबाद जिल्हा : खरीप पिकांचे नुकसान , हे आहेत विमा कंपनीच्या प्रतिनिधींचे मोबाईल नंबर


    उस्मानाबाद - प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) योजना खरीप-2020 अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयात मागील आठवडयात झालेल्या पावसामुळे अधिसुचित पिकांचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीने Crop Insurance व  Farmmitra या मोबाईल ॲपद्वारे नुकसानीची माहिती कृषि विभाग व विमा कंपनीस दयावी.


शेतकऱ्यांनी सदरील ॲप गुगल प्ले स्टोअर मधुन डाऊनलोड करुन घ्यावे. माहिती प्राप्त झाल्यानंतर कृषि विभागाचे अधिकारी/कर्मचारी व विमा प्रतिनिधी पाहणी करुन अहवाल कृषि विभागास व विमा कंपनीस सादर करतील. जिल्हयातील शेतकऱ्यांनी ज्या नुकसानग्रस्त पिकांचा विमा भरलेला आहे. अशा पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी ऑनलाईन  पध्दतीने दाखल करावी.


बजाज आलियांझ जनरल इंशुरन्स विमा कंपनीच्या तालुकानिहाय तालुका विमा प्रतिनिधीचे नाव संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.


उस्मानाबाद-गणेश नवनाथ गाडे-9637800804, तुळजापूर-सोमनाथ सुभाष लोहार-9767555702, उमरगा विजय युवराज बिराजदार-8623838783, लोहारा-गणेश पंडीत गावकरे-9404270007, भूम सुधीर सुंदरराव मोहिते-8788488325, परंडा दिपक अरुण परकाळे-9403394913, कळंब-लखन श्रीराम माराळकर-9325003717, वाशी-रामेश्वर साहेबराव सुरवसे-9403081038, वाशी व कळंब- पवन पाल (जिल्हा व्यवस्थापक)-8058943444, उस्मानाबाद व तुळजापूर-कुलदिन कुकडे(जिल्हा व्यवस्थापक) 8329064195, परंडा व भूम-तौसिफ कुरेशी(जिल्हा व्यवस्थापक) 8087624759, लोहारा व उमरगा-कविश उमक(जिल्हा व्यवस्थापक) 9021395708.क्रमांक आहे असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश घाटगे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments