ढोकी: ढोकी पो.ठा. चे पोलीस कॉन्स्टेबल- नितीन कोतवाड हे दि. 26.09.2020 रोजी 12.00 वा. सु. ढोकी पेट्रोल पंप चौकात कार्यालयीन कर्तव्या निमीत्त...
ढोकी: ढोकी पो.ठा. चे पोलीस कॉन्स्टेबल- नितीन कोतवाड हे दि. 26.09.2020 रोजी 12.00 वा. सु. ढोकी पेट्रोल पंप चौकात कार्यालयीन कर्तव्या निमीत्त उभे होते. यावेळी गावकरी- परवेज अब्दुलबारी काझी हा त्यांच्याजवळ आला. “तुझा फौजदार कोठे आहे. त्याने आमच्या नातेवाईकांच्या गुन्ह्यात मदत केली नाही. दोन दिवसात त्याला बघून घेतो नाहीतर माझे नाव बदल.” अशी धमकी देउन शिवीगाळ केली.
याचा विरोध नितीन कोतवाड यांनी केला असता परवेज काझी याने नितीन कोतवाड यांची गचांडी पकडून त्यांस धक्काबुक्की केली. अशा प्रकारे परवेज काझी याने पोलीसांच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन नितीन कोतवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS